बीड जिल्हा कोरोना अपडेट… पहा तालुकानिहाय बाधितांची आकडेवारी.

बीड दि.5 फेब्रुवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1592 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल 115 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1477 जण निगेटिव्ह आहेत.

(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)

आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-19, अंबाजोगाई-10, आष्टी-23, धारुर-2, गेवराई-12, केज-9, माजलगाव-6, परळी-19, पाटोदा-7, शिरुर-5, वडवणी-3 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. गुरुवारी 149, शुक्रवारी 116 तर आज 115 बाधित आढळले आहेत. आज आष्टी तालुक्यात सर्वाधिक 23 तर बीड व परळी तालुक्यात प्रत्येकी 19 रुग्ण आढळले आहेत.

बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या शुक्रवारच्या नोंदीनूसार 149 जण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण संख्या कमी होत असताना थांबलेलं मृत्यू सत्र मात्र सुरु झाल्याचा दिसत आहे. काल गुरुवारी मृत्यू संख्येत 3 ने तर आज 1 नेवाढ होवून जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2858 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 971 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 6.93 टक्के, रिकव्हरी रेट 96.45 तर डेथ रेट 2.65 आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोनाचे 13 हजार 840 नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात गुरुवारी 15 हजार 252 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. शुक्रवारी यामध्ये किंचितशी घट झाली असल्याचं दिसून येत आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दिवसभरात 27 हजार 891 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 74,91,759 नागरिक कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 96.26 टक्के एवढा आहे.

दरम्यान, राज्यात शुक्रवारी 81 कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूदर सध्या 1.83 टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत 7,52,54,877 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 77,82,640 (10.34 टक्के) नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या राज्यात 8,52,419 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2396 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!