पालकांची चिंता मिटली… बीड जिल्ह्यातील प्राथमिक शाळांबाबत मोठा निर्णय; सोमवारपासून भरनार पहिलेचे वर्ग ….

बीड दि.11 फेब्रुवारी – राज्य शासनाने दि.24 जानेवारी पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून या अनुषंगाने बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने केवळ आठवी ते बारावी वर्ग सुरु केली होती. मात्र आता जिल्ह्यात पुढील सोमवारपासून पहिलीपासूनचे वर्ग सुरु ठेवण्याची सुचना शिक्षण विभागाला जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा (Radhabinod Sharma) यांनी दिले आहेत.
( Parents’ worries allayed … Big decision regarding primary schools in Beed district; First class to be filled from Monday …. )
राज्य शासनाने राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (Third wave) पार्श्वभूमीवर 15 फेब्रुवारीपर्यंत दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी, शाळा व महाविद्यालय बंदच्या निर्णयासह निर्बंध (restrictions) कडक केले होते. मात्र कोरोना आलेख खालावल्यामुळे राज्य शासनाने कोरोना आटोक्यात असलेल्या जिल्ह्यात दि.24 जानेवारीपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.
याबाबतचे सर्व अधिकार स्थानिक जिल्हा प्रशासनाला बहाल करण्यात आले होते. यामुळे बीड जिल्ह्यातील पालकांचे लक्ष जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाकडे लागून होते. यात दि.21 जानेवारीला जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आरोग्य विभागाकडून जिल्ह्याचा आढावा घेवून माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाच्या (Education Department) वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा केली.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्येत लक्षणीय वाढ दिसत असल्यामुळे तुर्तास शाळा बंदचा निर्णय जैसे थे ठेवून केवळ दहावी व बारावीचे वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर गेल्याच आठवड्यात आठवी ते बारावी वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेत सोमवारपासून माध्यमिक शाळा सुरु करण्यात आल्या. मात्र प्राथमिकचे वर्ग सुरु होत नसल्यामुळे पालकांतून नाराजीचा सुर येत होता.
बीड जिल्ह्यात मागच्या कांही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा (Corona Positive) आकडा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. यामुळे दि.7 फेब्रुवारी पासून 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश बीड जिल्हा शिक्षण विभागाच्या वतीने काढण्यात आले होते. यात आता आनंदाची बातमी म्हणजे प्राथमिक विभागाच्या शाळाही येत्या सोमवार दि.14 फेब्रुवारीपासून सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी काढले आहेत.
शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी ग्रामस्थांचे शाळेसमोर आंदोलन
दरम्यान, अंबाजोगाई तालुक्यातील ममदापुर पाटोदा येथे शाळा सुरु करण्यासाठी आज आंदोलन करण्यात आले. बाजार, दुकाने, धार्मिक स्थळे, मार्केट सर्वत्र सुरू असताना बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा कोरोना नावाखाली बंद आहेत. तीन वर्षांपासून शाळा सुरळीत नाहीत , ऑनलाईन च्या नावाखाली शिक्षणाचा बोऱ्या वाजला, शाळा सुरु करा अशी मागणी करत पाटोदा (म) येथील विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी शाळेसमोर आंदोलन केले. प्रशासनाच्या आश्वासन नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.