धारुर व माजलगावचे मुख्याधिकारी विशाल भोसले अडचणीत; काय आहे प्रकार पहा…

किल्ले धारूर दि.23 मार्च – धारुर (Dharur) नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी व माजलगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी (Chief Officer) विशाल भोसले यांना उच्च न्यायालयाने (High Court) पकड वारंट (Arrest warrant) जारी केले आहे. यामुळे भोसले हे सध्या अडचणीत सापडले आहेत.
माजलगाव (Majalgoan) नगर परिषदेच्या एका प्रकरणात मनोहर कांबळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान मुख्याधिकारी गैरहजर राहिले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे न्या. रविंद्र घुगे व न्या. एस.जी. मेहेरे यांनी त्यांच्या विरोधात जामिनपात्र पकड वारंट जारी केले आहे. दि.4 एप्रिल पर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश खंडपिठाने दिले आहेत.
विशाल भोसले यांनी किल्ले धारूर नगर परिषदेनंतर केज (Kaij) व सध्या माजलगाव येथे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत. धारुर नगर परिषदेचे (Municipal Council) प्रभारी मुख्याधिकारी म्हणून सोमवार दि.21 पर्यंत ते कार्यरत होते.
( Chief Officer Vishal Bhosale in trouble; See what type it is … )