अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीचा झटका; मुंबई व उस्मानाबाद येथील मालमत्ता जप्त.

मुंबई दि.13 एप्रिल – शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minorities Minister Nawab Malik) यांना झटका देणारी घटना समोर आली आहे. नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीने (ED) आज मोठी कारवाई केली आहे. ईडीने नवाब मलिक यांची मुंबई, उस्मानाबाद येथील संपत्ती जप्त केली आहे.
कुर्ल्यातील गोवावाला कंपाउंडसह नबाव मलिक यांच्या आठ मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत. यामध्ये उस्मानाबाद (Osmanabad) मधील 147 एकर जमीन, कुर्ल्यातील संपूर्ण गोवावाला कंपाउंड, व्यावसायिक जागा तसेच कुर्ला पश्चिमेतील तीन फ्लॅट्स आणि 2 राहती घर अशी मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.
या मालमत्तांची किंमत अजून समोर आली नसली तरी करोडों रुपयांची ही मालमत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये मुंबईतील (Mumbai) महत्त्वाची संपत्ती आणि उस्मानाबादेतील 147 एकर जमिनीचा समावेश आहे. ईडीने संबंधित कारवाई ही मनी लॉन्ड्रिंग (Money laundering) प्रकरणी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या नेत्यांमागे इडीचा ससेमिरा लागला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena MLA Pratap Saranaik) यांच्यावर ईडीने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रताप सरनाईक यांच्या नावावर असलेले दोन फ्लॅट ज्यांची किंमत तब्ब्ल ११ कोटी रुपये इतकी आहे, ते दोन्ही फ्लॅट ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत.
( ED blow to Minorities Minister Nawab Malik; Property in Mumbai and Osmanabad confiscated. )