बीडच्या खासदार प्रीतम मुंडें चर्चेत; इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमध्ये खळबळजनक दावा…

मुंबई दि.22 एप्रिल – खाजगी वृत्तवाहिनी ‘झी 24 तास’च्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमधून खळबळजनक माहिती समोर आली आहे. राज्यातील 10 खासदारांनी आपला निधी खर्च केलाच नसल्याचे समोर आले असून बीडच्या (Beed) खासदार डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांचाही यात समावेश आहे.
भारतीय खासदारांना प्रतिवर्षी 5 कोटी रुपयांचा निधी विकासकामासाठी वितरीत केला जातो. सदर खासदार निधी रस्ते, सार्वजनिक आरोग्य, शालेय शिक्षण, पिण्याचे पाणी आणि स्वच्छता या प्रमुख पाच कारणांसाठी निधी देण्याची शिफारस करण्याचे अधिकार खासदारांना असतात. महाराष्ट्रात खासदारांनी हा आपला निधी खर्चाचा अधिकार किती प्रमाणात वापर केला याचा एक धक्कादायक रिपोर्ट खाजगी वृतवाहिनीच्या हाती लागला आहे.
महाराष्ट्र राज्यातील 10 खासदार सदर निधी खर्च करण्यात नापास झाले असल्याची माहिती समोर आली आहे. विकासनिधीचा खर्च काही खासदारांनी वापरलाच नाही. तर काहीं खासदारांनी फक्त थोडा थोडकाच निधी वापरला आहे. बीडच्या डॉ. प्रीतम मुंडेंनी दमडीही खर्च केलेला नाही. तर जळगावचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील हे खर्चात मात्र, सर्वात आघाडीवर आहेत.
पहा कोणी किती निधी केला खर्च…
– भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे (बीड) – शून्य टक्के
– भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज (सोलापूर) – 9.10 टक्के
– भाजप खासदार संजयकाका पाटील (सांगली) – 13.67 टक्के
– भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (जालना) -16.1टक्के
– शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (मावळ) 22.3 टक्के
– शिवसेना खासदार भावना गवळी (यवतमाळ-वाशिम ) 22.12 टक्के
– शिवसेना खासदार प्रतापराव जाधव, (बुलडाणा) 23.16 टक्के
– भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर (माढा ) 26.62 टक्के
– शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (उस्मानाबाद) 27.19 टक्के
– राष्ट्रवादीचे (NCP) खासदार श्रीनिवास पाटील (सातारा ) 28.04 टक्के
सर्वाधिक निधी खर्च केलेले खासदार
– भाजप खासदार उन्मेष पाटील (जळगाव) 5 कोटी 4.96 कोटी 97.30 टक्के
– भाजप खासदार सुधाकर श्रृंगारे,(लातूर) 5 कोटी 3.93 कोटी 76.73 टक्के
– भाजप खासदार मनोज कोटक (मुंबई उत्तर-पूर्व) 7 कोटी 4.77 कोटी 66.71 टक्के
– भाजप खासदार रक्षा खडसे (जळगाव) 5 कोटी 3.27 कोटी 63.51 टक्के
– शिवसेना (Shiv Sena) खासदार राजेंद्र गावित (पालघर) 7 कोटी 4.37 कोटी 61.05 टक्के
– भाजप खासदार पूनम महाजन (मुंबई उत्तर-मध्य) 7 कोटी 4.14 कोटी 57.71 टक्के
– भाजप खासदार गोपाल शेट्टी (मुंबई-उत्तर) 7 कोटी 4.08 कोटी 56.85 टक्के
– भाजप (BJP) खासदार रामदास तडस (वर्धा ) 7 कोटी 4.02 कोटी 56.11 टक्के
– शिवसेना खासदार संजय जाधव (परभणी) 7 कोटी 3.9 कोटी 54.45 टक्के
– एमआयएम (AIMIM) खासदार इम्तियाज जलील (औरंगाबाद) 7 कोटी 3.81 कोटी 53.03 टक्के
( Beed MP Pritam Munde in discussion; Sensational claims in the investigation report … )