धारुरमध्ये खळबळ… चोरीच्या उद्देशाने हातपाय बांधून व्यापाऱ्यास बेदम मारहाण; केज-धारुर रस्त्यावरील प्रकार.

किल्ले धारूर दि.26 एप्रिल – धारुर येथील आडत व्यापारी मारुतिराव गायके हे गंभीर जखमी, हातपाय बांधलेल्या व बेशुद्ध अवस्थेत आढळून आले असून त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि.25 सोमवारी आडत व्यापारी मारुतिराव गायके हे खाजगी कामानिमित्त केज येथे गेले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत परत आले नसल्याने नातलगांनी पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी रात्री एकच्या सुमारास केज रस्त्यावर शोध घेतला असता कासारी पाटीजवळ गायके यांची दुचाकी पडलेली दिसली. शोधाशोध केला असता काही अंतरावर हातपाय बांधलेल्या व गंभीर जखमी व बेशुद्ध अवस्थेत व्यापारी आढळून आले.

गायके यांच्या पाठीवर व मांडीवर अज्ञात धारदार शस्त्राने वार करण्यात आलेले आहेत. त्यांना तात्काळ धारुर (Dharur) येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. यानंतर पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात (SRTR) दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेमुळे धारुर शहरात खळबळ उडाली असून व्यापाऱ्याला चोरीच्या उद्देशाने जबर मारहाण झाल्याची चर्चा आहे.

याबाबत सहाय्यक पोलिस निरिक्षक (Assistant Police Inspector) व्हि.एस. आटोळे यांच्याशी संपर्क केला असता सदर व्यक्ती घरी परत आला नसल्याची माहिती मिळाल्यामुळे तिचा पोलिसांनी (Police) शोध घेतला. यावेळी केज रस्त्यावर (Kaij Road) कासारी पाटीजवळ ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. अद्यापही ते बेशुद्ध अवस्थेत असून तपास सुरु असल्याची माहिती दिली. याबाबत अद्याप कसलाही गुन्हा नोंद नाही. सकाळीच पोलिस अंबाजोगाई रुग्णालयाकडे पुढील तपासासाठी गेले असल्याचे कळते.

( Sensation in Dharur … Merchant being beaten to death with his hands and feet tied for the purpose of stealing; Kaij-Dharur road type. )

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!