दिलदार मित्र हरपला; धारुरचे पत्रकार सतिश वाकुडे यांचे निधन.

किल्ले धारूर दि.27 मे – धारुर येथील पत्रकार सतिश विठ्ठलराव वाकुडे (वय 46) यांचे दिर्घ आजाराने अंबाजोगाई येथे स्वा.रा.ति. रुग्णालयात उपचार सुरु असताना शुक्रवारी रात्री 8.30 वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या शनिवारी (दि.28) सकाळी 11 वाजता धारुर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
धारुर शहरात गेली 25 वर्ष पत्रकारितेत दिर्घ काळ काम केलेले सतीश वाकुडे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर लातूर, मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. काल गुरुवार (दि.26) रोजी प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे त्यांना अंबाजोगाई येथील स्वा.रा.ति. शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज शुक्रवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मावळली.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मुळगावी धारुर येथे पोलिस स्टेशन मागील स्मशानभुमीत उद्या शनिवार (दि.28) रोजी सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे एक दिलदार पत्रकार गमावला आहे अशी प्रतिक्रिया येत आहेत.
25 वर्षांची पत्रकारिता…
सतीश वाकुडे यांनी जवळजवळ 25 वर्ष पत्रकारिता केली. त्यांनी 1995-96 पासून आपल्या पत्रकारितेस सुरुवात केली. दै.एकमत, दै. तरुण भारत, दै.लोकपत्र, दै. पुण्यनगरी व दै. पुढारी अशा आघाडीच्या वृत्तपत्रात त्यांनी तालुका प्रतिनिधी म्हणून काम केले. ते किल्लेधारूर तालुका पत्रकार संघ (रजि.) चे सचिव होते. त्यांच्या निधनामुळे पत्रकारितेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. वाकुडे कुटूंबियांच्या दुःखात बीड24 न्यूज तथा किल्लेधारूर तालुका पत्रकार संघ सहभागी आहे.
( Lost heartfelt friend; Journalist Satish Wakude passes away. )