चक्क गटविकास अधिकाऱ्यांची गांधीगीरी…
का केली गांधीगीरी ?

किल्ले धारूर दि.4 जुन – धारूर (Dharur) येथील पंचायत समिती कार्यालयात दि.3 जुन शुक्रवारी पंचायत समितीच्या अभ्यांगत कक्षात गटविकास अधिकारी कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देवून गांधीगीरी करत असल्याचे आढळून आले. गटविकास अधिकाऱ्यांची ही गांधीगीरी चांगलीच चर्चेत आली असून कर्मचारी वर्गातून कौतूकही होत आहे.
धारुर पंचायत समितीत गेल्या काही महिन्यांपासून आर. एस कांबळे हे गटविकास अधिकारी ( Block Development Officer ) म्हणून रुजू झाले. धारुर तालुका तसा मागासलेला असल्याने येथे नौकरी निमित्त येणाऱ्या सर्वच विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना येथे काम करण्यासाठी झालेली बदली म्हणजे शिक्षेचा भाग समजला जातो. यामुळे अनेक वेळा येथील कोणत्याही कार्यालयात अधिकारी व कर्मचारी पुर्णवेळ थांबत नसल्याचे अनेक वेळा दिसून आलेले आहे. याबाबत वृत्तपत्रांनी आवाज उठवला तर अनेक संघटनांनी वेळोवेळी कार्यालयाचे पंचनामे केली. मात्र यात फारसा फरक पडलेला दिसत नसल्याचे आढळून आले.
याचाच प्रत्यय काल शुक्रवारी पंचायत समितीत दिसुन आला. येथील कर्मचाऱ्यांना अनेक वेळा सुचना देऊन हि कर्मचारी कार्यालयात उशिरा येत असल्यामुळे चक्क गटविकास अधिकाऱ्यांना गांधीगीरी करावी लागली. लेट लतीफ कर्मचाऱ्यांना मुख्य प्रवेशद्वाराजवळ अभ्यंगत कक्षात बसून गुलाब पुष्प देत स्वागत करण्याची गांधीगीरी गटविकास अधिकारी आर.एस. कांबळे यांनी केली. यावेळी कार्यालयात उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर यापुढे कारवाई प्रस्तावीत करण्याची सुचना त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिल्या.
धारूर येथील पंचायत समिती कार्यालयात सर्वच कर्मचाऱ्यांची मनमानी वाढली आहे. कार्यालयात येण्याची वेळ कर्मचारी पाळत नाहीत. कुठलीही नोंद न करता कार्यालयात आपले कक्ष मोकळे ठेवून निघून जातात याचा अनुभव आल्यामुळे कांबळे यांनी गांधीगीरीचा मार्ग अवलंबला. पंचायत समिती कार्यालयात विविध विभागात एकुण 38 कर्मचारी आहेत. या पैकी 6 पदे रिक्त आहेत. तिन विभागात पंधरा रोंजदारी कर्मचारी आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांचे उपस्थिती बाबत गटविकास अधिकाऱ्यांनी कक्षात जाऊन तपासणी करत एका महिन्यात चार वेळा हजेरी रजिस्टरवर नोंदी घेतल्या.
महसूल विभागाने गैरहजर कर्मचाऱ्यांचा एक वेळा पंचनामाही केला. संबंधीत गैरहजर कर्मचाऱ्यांना गटविकास अधिकारी यांनी नोटीस बजावल्या, तरी ही कर्मचारी वेळत येत नसल्याने शुक्रवारी 3 जुन रोजी मुख्यालय दिनी गटविकास अधिकारी आर. एस. कांबळे यांनी अधिक्षक एस. जी. शिंदे यांना सोबत घेऊन पंचायत समितीचे प्रवेशद्वारात बसून दहा नंतर येणारे कर्मचाऱ्यांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचे स्वागत अनोख्या पध्दतीने केली. शासनाच्या सकाळी 9.45 ते 6.15 या कार्यालयीन वेळेचे तंतोतंत पालन करण्याच्या सुचना दिल्या. या पुढे कडक कारवाई प्रस्तावीत करण्याचा इशाराही दिला. याप्रसंगी आठ ते दहा कर्मचारी वेळेत कार्यालयात आले होते. तर दहा कर्मचारी वेळे नंतर आल्याचे आढळले. त्यांचे स्वागत केले गेले.
तिन कर्मचारी रजेवर होते. तर चक्क सहा ते सात कर्मचारी कुठली ही नोंद न करता सुचना न देता गैरहजर होते. रोंजदारी असणारे कर्मचारी कार्यालयीन वेळेत कधीच हजर राहत नाहीत. त्यांचे नियूक्ती जिल्ह्यावरून असल्याने त्यांच्यावर निंयत्रण ठेवणे अवघड असल्याची कुजबूज होती. या वेळी गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई साठी वरिष्ठांना अहवाल पाठवणार असल्याचे गटविकास अधिकारी आर. एस. कांबळे यांनी सांगीतले. या आगळ्या वेगळ्या कारवाई मुळे सर्वत्र चर्चेचा विषय झाला होता. आता तरी कर्मचारी वेळेत उपस्थित राहतील का ? असा प्रश्न केला जात आहे .
( Gandhigiri of group development officers in Dharur … Why the time of Gandhigiri? )