महाराष्ट्रात मास्कची सक्ती; पहा कुठे वापरावा लागणार मास्क.

मुंबई दि.4 जुन – महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत वाढलेल्या कोरोना रुग्ण (Corona patient) संख्येमुळे राज्य सरकारने मोकळ्या जागा वगळता सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. तसे आदेश वजा पत्र राज्याचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाच्या केसेसमध्ये होणारी वाढ पाहता राज्य सरकारने नागरिकांना मोकळ्या जागा वगळता सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. केंद्राचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना पत्र पाठवून सूचना दिल्या आहेत. त्यानंतर व्यास यांनी स्थानिक आरोग्य अधिकारी आणि जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्यास सांगितलं आहे.
राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात, सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचे आवाहन करण्यासंबंधीच्या आदेशांसह जिल्हा आणि नागरी अधिकाऱ्यांना कोरोना चाचण्या वाढवण्याच्या व अन्य काही सुचनांचे आदेश जारी केले आहेत.
कुठे असणार मास्क बंधनकारक …
रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह, कार्यालये, रुग्णालये, महाविद्यालये, शाळा यासारख्या सार्वजनिक ठिकाणी मास्क लावण्याबद्दल सरकारने आवाहन केलं आहे. (Mask) महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी जिल्हा आणि नागरी अधिकाऱ्यांना कोरोना चाचण्या वाढवण्यास सांगितलं आहे.
( Forced masks in Maharashtra; See where the mask should be used. )