कर्करोगाने घेतला बालकाचा जीव; धारुर तालुक्यातील गावावर शोककळा.

किल्ले धारूर दि.16 जुन – कर्करोग (Cancer) आजारामुळे एका दहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि.15 रोजी पहाटे घडली. या घटनेने धारुर तालुक्यातील कांदेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
वेदांत प्रताप शेप (रा.कांदेवाडी ता.धारुर) मयत बालकाचे नाव असून औरंगाबाद (Aurangabad) येथील खाजगी रुग्णालयात वेदांत वर गेली पंधरा दिवसांपासून उपचार सुरु होते. ब्रेन ट्यूमर (Brain tumor) नावाचा कर्करोगाने वेदांतला ग्रासले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून उपचार चालू असताना वेदांतची प्राणज्योत बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मालवली.
या घटनेमुळे कांदेवाडी गावात शोककळा पसरली. अत्यंत शोकाकुल वातावरणात कांदेवाडी गावात वेदांत वर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने अख्ख्या गावावर शोककळा पसरली आहे. धारुर (Dharur) पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब खाडे यांचा तो भाच्चा होता.
( Cancer kills child; Mourning on a village in Dharur taluka. )