विजतारेत विजप्रवाह उतरल्याने चौघांचा मृत्यू ; मराठवाड्यातील दुर्दैवी घटना.

कन्नड दि.9 जुलै – विजतारेत विजप्रवाह उतरल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी कन्नड तालुक्यात घडली. नविन डीपीला विद्यूत पुरवठा जोडण्यासाठी तारा ओढतांना विजतारेत अचानक विजप्रवाह आल्यामुळे ही घटना घडली. सदर दुर्घटना कन्नड तालुक्यातील हिवरखेडा ( नांदगिर वाडी ) शिवारात घडली.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण मराठवाड्यात (Marathwada) पाऊस कोसळत आहे. यातच कन्नड तालुक्यात नवीन डिपीसाठी विजतार ओढत असताना विद्युत प्रवाह सुरु झाल्यामुळे शुक्रवारी (दि.8) चौघांची मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आदिनाथ बाळकृष्ण मगर ( वय २८ ), भारत बाबासाहेब वरकड ( वय ३२), गणेश नारायण थेटे ( वय २८ ) व जगदीश छगनराव मुरकुंडे ( वय ३७) सर्व रा. नावडी ता. कन्नड यांचा मृतात समावेश आहे.
हिवरखेडा नांदगीरवाडी शिवारात नविन डीपी बसविण्याचे काम सुरु होते. डीपीला विद्युत पुरवठा करण्यासाठी विजतारा जोडण्याचे काम चौघे करीत होते. त्यासाठी तार ओढतांना विजतारेत अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने (lightning strike) चौघेही जागेवरच मरण पावले. सदर घटनेची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सदर काम सुरु असताना विज पुरवठा कसा सुरु झाला ? विज पुरवठा महावितरण (Mahavitaran) कर्मचाऱ्यांनी कि कंत्राटदाराकडून सुरु करण्यात आला याचा तपास पोलिस (Police) करीत आहेत. दरम्यान या दुर्दैवी (unfortunate incident) घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
( Four killed in lightning strike The unfortunate incident in Marathwada. )