धारुर येथील इनाम जमीन प्रकरणात तहसीलदार व कारकुन अडचणीत.

51 / 100

किल्लेधारूर दि.23 जुलै – धारुर येथील इनाम जमीन प्रकरणात तहसीलदार व कारकुन अडचणीत आले असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून संबंधितांची पेन्शन व पगार प्रकरणात निकाली लागेपर्यंत थांबवण्याच्या मागणीबाबत तात्काळ अहवाल पाठवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

राज्यात सध्या वक्फ व इतर धार्मिक क्षेत्राच्या इनाम जमीन घोटाळ्याची प्रकरणे मोठ्या प्रमाणात उघड होत आहेत. यात बीड (Beed) जिल्हा आघाडीवर असून जिल्ह्यातील बीड, आष्टी, अंबाजोगाई व धारुर (Dharur) येथील अनेक इनाम जमीनींचा समावेश आहे. इनाम जमीन बेकायदेशीररित्या हस्तगत करणे, चुकीच्या व बनावट नोंदीसह जमिनी बळकावणे तसेच बेकायदेशीर इनाम खालसा करण्याची प्रकरणे समोर येत आहेत. जिल्ह्यात यापुर्वीच उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांसह महसुली कर्मचाऱ्यांवर गुन्हे नोंद झाली आहेत.

यातच धारुर येथील आणखी एका इनाम जमीन प्रकरणात एका तहसीलदारासह कारकुनाचा पगार व पेन्शन थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयातून पत्र काढण्यात आले आहे. मौजे धारुर येथील तौकलशा दर्गा आणि मुलायम दायमशा दर्गाच्या प्रकरणात तत्कालीन तहसीलदार (Tehsildar) वंदना शिडोळकर व कारकुन कोकरे यांनी दि.28 फेब्रुवारी 2022 रोजी आर्थिक गैर व्यवहार करुन निकाल दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत विभागीय आयुक्त कार्यालय ( Office of the Divisional Commissioner ) औरंगाबाद (Aurangabad) येथून नायब तहसीलदार सुनंदा पारवे यांनी जिल्हाधिकारी बीड यांना दि.15 जुलै 2022 रोजी पत्र काढले आहे. सदर प्रकरणी योग्य ती कारवाई करुन अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश पत्राद्वारे देण्यात आले आहेत.

( Tehsildar and clerk in trouble in Inam land case in Dharur. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!