धारुर पोलिसांनी 13 लाख 21 हजार रुपये केले देवस्थानाला परत .

किल्ले धारूर दि.29 जुलै – धारुर पोलिसांनी 13 लाख 21 हजार रुपये अंबाजोगाई तालुक्यातील उमराई येथील चार बाई जोगणी माताजी मंदिर ट्रस्टला दि.28 रोजी परत केले. सदर ट्रस्टचे प्रकरण न्याय प्रविष्ट होते, न्यायालयाच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे यांनी जप्त केलेली रक्कम 13 लाख 21 हजार 320 रुपये ट्रस्टकडे सुपुर्द केले.
चारबाई जोगनी माताजी मंदिर ट्रस्ट माताजी नगर उमराई , ता.अंबाजोगाई येथील मंदिरातील 13 लाख 21 हजार 320 रुपयाची रक्कम गु.र.न.60/22 या गुन्ह्यात कलम 124 मुंबई पोलीस कायदा अंतर्गत जप्त करण्यात आली होती. सदरील प्रकरण धारूर (Dharur) न्यायालयात न्याय प्रविष्ठ होते. ट्रस्ट च्या वतीने अॅड. अमोल साखरे यांचा सखोल युक्तीवाद ऐकून सदरील प्रकरणात चारबाई जोगनी माताजी ट्रस्ट यांना न्यायालयाने जप्त केलेली रक्कम परत करणाचे आदेश दिले.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानूसार चारबाई जोगनी माताजी ट्रस्ट चे सचिव यांना 13,21,320 (तेरा लाख एक्केविस हजार तीनशे वीस) रुपयाची रक्कम सहा. पोलीस निरीक्षक (Assistant Police Inspector) विजय आटोळे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. सदरील प्रकरणी जेष्ठ विधिज्ञ अॅड. एस.के.केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. अमोल साखरे यांनी बाजू मांडली व त्यांना अॅड.एस. जे. गडदे अॅड.राज नाईकवाडे, अॅड.सुरज नखाते यांनी सहकार्य केले.
( Dharur police returned 13 lakh 21 thousand rupees to the temple. )