पाटोदाजवळ भीषण अपघात ; केज तालुक्यातील जिवाचीवाडीच्या सहा जणांचा मृत्यू .

41 / 100

पाटोदा दि.14 अॉगस्ट – पाटोदा (जि.बीड) जवळ कार व आयशर टेम्पोचा भीषण अपघात होवून केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील सहा जण जागिच ठार झाल्याची घटना आज सकाळी घडली.
( Fatal accident near Patoda; Death of six people from Jivachiwadi in Kaij taluka.)

बीड जिल्ह्याचे भुमिपुत्र शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती निधनामुळे शोकसागरात बुडालेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा एक भीषण अपघात घडला आहे. आज काही वेळापुर्वी पुण्याहून केजच्या दिशेने निघालेल्या जिवाचीवाडी येथील सहा प्रवाशांचा या अपघातात जागिच मृत्यू झाल्याचे वृत्त येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.

अहमदपूर-अहमदनगर मार्गावर बामदळे वस्ती (ता.पाटोदा) टेम्पो-स्विफ्टचा अपघात झाला. लग्नासाठी केजला निघालेल्या कारमधील सहा जणांचा जागीचं मृत्यू. मृतांत दोन लहानग्यांचा समावेश. पुण्याहून केज तालुक्यातील जिवाचीवाडीकडे जात असलेल्या कारला एका आयशर टेम्पोने चिरडल्याने हा भीषण अपघात (accident) झाला आहे. या अपघातात दोन बालकांसह कारमधील सहा जणांचा जागिच मृत्यू झाला. याबाबत अद्याप सविस्तर माहिती उपलब्ध होवू शकली नाही. मात्र बीड (Beed) जिल्ह्यात हा दुसरा अपघाती धक्का असून जिल्हा शोकसागरात बुडाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!