चर्चा तर होणारच…. टिक टॉक स्टार लेडी कंडक्टर निलंबित ; पहा काय आहे प्रकार…

कळंब दि. 3 ऑक्टोबर – उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबमधील लालपरीच्या टिक टॉक स्टार महिला कंटक्टर मंगल गिरी यांनी सोशल मीडियावर विविध प्रकारचे रिल्स शेअर केल्या आहेत. मंगल गिरी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एसटी प्रशासनाकडून तिला निलंबित (suspended) करण्यात आले आहे. यानंतर मात्र सध्या एकच चर्चा होवून त्यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया येत आहेत.
टिक टॉक स्टार (Tik Tok star) लेडी कंडक्टर निलंबित केल्या प्रकरणी विभाग नियंत्रकानी खुलासा केला असून ड्राइवर सीटवर बसून व्हिडिओ केल्याने बेफिकीरी दाखवल्यामुळे त्यांचे निलंबन (suspension) केले असल्याचा खुलासा विभाग नियंत्रक चेतना केरवडकर यांनी दिला आहे. मंगल गिरी यांच्या एका व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. एसटी महामंडळाचा ड्रेस घालून तुळजाभवानी देवीच्या गाण्यावरचा त्यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल (viral video) झाला आहे. अशा व्हिडिओमुळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाल्याचे सांगत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. एवढेच नाही तर त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या सहकार्यालाही निलंबित करण्यात आले आहे. या निलंबनाच्या कारवाईवर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे.
वाहन हे लोकांच्या सोयीसाठी असते, वाहनात बसून त्यांनी ड्राइवर सीटवर बसून काही व्हिडिओ बनविले आहेत. जर वाहन सुरू झाले असते तर अनुचित प्रकार घडला असता त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे वर्तन हे चुकीचे असून त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा येईल असे कुठलेच कृत्य केले नसल्याचे ही त्यांनी सांगितले. सोशल मीडिया (social media) अकाऊंटवरून अशा व्हिडीओमधून एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत या लेडी कंडक्टरला एसटी महामंडळाने (ST Corporation) निलंबित केले आहे. या कारवाईनंतर मात्र या विषयाची मोठी चर्चा होत असून लेडी कंडक्टरवर केलेल्या कारवाईवरही आक्षेप नोंदवला जात आहे.
( There will be a discussion… Tik Tok star lady conductor suspended; See what kind of… )