तरुणांना ब्लॉगर होण्याची संधी ; यामाध्यमातून होता येईल कोट्याधिश !

किल्लेधारूर दि.14 एप्रिल – तरुणांना ब्लॉगर होण्याची संधी येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश गवळी यांच्या प्रयत्नांतून होत आहे. ब्लॉग बनवून रोजगार कसा मिळवता येईल या विषयावर किल्लेधारुर येथे दि.16 एप्रिल रविवारी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
( Opportunities for youth to become bloggers; Billionaires will be made through this! )
बदलत्या काळात रोजगार निर्मितीच्या व्याख्याही बदलत आहेत. इंटरनेटच्या साहाय्याने ब्लॉग (Blog) बनवूनही रोजगार निर्मिती होते हे आता जगासमोर आलेले आहे. धारूर शहरात युवकांना ब्लॉगच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुरेश गवळी यांच्या वतीने दि.16 एप्रिल रोजी येथील पं.दिन दयाल उपाध्याय नाट्यगृह येथे ब्लॉग बनवणे या विषयावर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला बीड (Beed) जिल्ह्यातील कोळगाव येथील प्रसिद्ध ब्लॉगर अक्षय रासकर हे उपस्थित होवून मार्गदर्शन करणार आहेत.
संगणकीय युगामध्ये मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत. मात्र याबाबतची माहिती व प्रशिक्षण अद्याप बहुतांशी युवकांकडे नाही. अशा माध्यमाचा वापर करुन लाखो रुपये कमावता येतात हे कोळगाव जि.बीड येथील रासकर बंधूनी दाखवून दिले आहे. यामुळे अशा प्रकारे मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करून ब्लॉग बनवणे या संदर्भात धारूरमध्ये प्रशिक्षण शिबिराचे दि.16 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला प्रसिद्ध ब्लॉगर अक्षय रासकर हे स्वतः मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरात जास्तीत जास्त होतकरु युवकांनी सहभागी होवून लाभ घेण्याचे आवाहन संयोजक सामाजिक कार्यकर्ते सुरेश गवळी यांनी केले आहे.