राष्ट्रीय

Demonetisation पुन्हा नोटबंदी… दोन हजारांच्या नोटा मागे घेणार.

55 / 100

नवी दिल्ली दि.19 मे – Demonetisation भारतीय रिझर्व बँकेने Reserve Bank of India 2000 रुपयांच्या सर्वात मोठ्या चलनी नोटा मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व बँकेच्या म्हणण्यानुसार, 2000 रुपयांची नोट यापुढे छपाई बंद केली जाणार आहे. रिझर्व बँकेच्या म्हणण्यानुसार, 23 मे 2023 पासून कोणत्याही बँकेत 2000 रुपयांच्या नोटा बदलल्या जाऊ शकतात. नोट बदलण्याची मर्यादा 20,000 रुपये असेल असे रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. Demonetisation again… Rs 2000 notes will be withdrawn.

सात वर्षांपूर्वी 8 नोव्हेंबर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक 500 व 1000 रुपयांच्या चलनी नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. नोटबंदीनंतर Demonetisation रिझर्व्ह बँकेने 500 व 2000 रुपयांच्या नवीन नोटा जारी केल्या होत्या. मात्र गेल्या काही महिन्यांपासून बाजारात 2000 रुपयांच्या नोटा चलनात कमी दिसत होत्या. एटीएममध्येही 2000 रुपयांच्या नोटा मिळत नसल्याचे लोकांच्या तक्रारी होत्या. या संदर्भात रिझर्व्ह बँकेने Reserve Bank of India आपल्या वार्षिक अहवालात 2000 रुपयांच्या नोटेबाबत बरीच माहिती दिली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2019-20, आर्थिक वर्ष 2020-21 आणि आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 2000 रुपयांची एकही नोट छापली गेली नव्हती . त्यामुळे बाजारात 2000 रुपयांच्या नोटांचे चलन कमी झाले आहे. यानंतर आता रिजर्व बँकेने Reserve Bank of India मोठा निर्णय घेत 2000 रुपयांच्या नोटा परत मागवल्या आहेत. यामुळे पुन्हा एकदा नोटबंदीची Demonetisation आठवण होत असून खळबळ उडाली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!