Murder भावाच्या मदतीने पत्नीनेच केला दारुड्या पतीचा खुन.

किल्लेधारुर दि.4 जून – Murder धारुर पोलिस Police ठाणे हद्दीतील आडस येथे कोरड्या शेततळ्यात सापडलेल्या प्रेताच्या खूनाचा उलगडा झाला असून दारुच्या व्यसनाने त्रस्त झालेल्या पत्नीने आपल्या भावाच्या मदतीने त्याचा खुन केल्याच्या तक्रारीवरुन खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. दोन्ही आरोपीना पोलिसांनी Police अटक केली आहे. Murder … The wife committed the murder of her drunken husband with the help of her brother.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.3 शनिवारी आडस ता. केज येथे रमेश आडसकर यांच्या शेतातील कोरड्या शेततळ्यात तरुणाचे प्रेत आढळले होते. सदर प्रेत आडस येथील विकास शिवाजी भोसले याचे असल्याचे निष्पन्न झाले. मात्र सदर प्रकार आत्महत्येचा नसून खूनाचा असल्याचा संशय पोलिसांना आला. त्या दृष्टीने धारुरचे Dharur सहाय्यक पोलिस निरिक्षक विजय आटोळे यांनी तपास सुरु केला. अवघ्या बारा तासात पोलिसांनी सदर प्रकार खूनाचा असल्याचे सिध्द केले. मयताला दारुचे व्यसन असल्याने तो सतत पत्नीला त्रास देत होता. या त्रासातूनच पत्नीने भावाच्या मदतीने पतीचा drunken husband गळा आवळून खून केला. मयताची आई द्रोपदी शिवाजी भोसले हिच्या तक्रारीवरुन धारुर Dharur पोलिसात खूनाचा Murder गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी संशयित आरोपी पत्नी नंदिनी व मेहूणा सिध्देश्वर आशोक खडके यांना ताब्यात घेतले आहे. कलम 302, 306 व 34 अन्वये गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक संतोष भालेराव करत आहेत.