राजकीय

Sharad Pawar बीडमध्ये शरद पवारांचा हल्लाबोल ; पवारांच्या सभेनंतर विधानसभेचे चेहरे आले समोर…

57 / 100 SEO Score

बीड दि.17 अॉगस्ट – Sharad Pawar बीडमध्ये आज राष्ट्रवादीचे NCP सर्वेसर्वा शरद पवार यांच्या स्वाभिमानी सभेला भरभरून प्रतिसाद मिळाला. या सभेत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून बीडच्या Beed राजकारणापर्यंत भाष्य केलं.

शरद पवारांसह जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, रोहित पवार यांची बीडच्या सभेता उपस्थिती होती. यावेळी भाषणाच्या सुरुवातीला शरद पवारांनी स्व.केशरकाकू क्षीरसागर यांची आठवण सांगून काकूंचा नातू आमदार संदीप क्षीरसागर यांचं कौतुक केलं. बीडमध्ये Beed आपल्या भाषणात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते बीडमधल्या सध्याच्या राजकारणावर भाष्य केलं. मणिपूरचा मुद्दा आणि नरेंद्र मोदींच्या Narendra Modi स्वातंत्र्य दिनानिमित्तच्या भाषणावर त्यांनी सडकून टीका केली. स्व. केशरकाकू क्षीरसागर यांच्याबाबतीत बोलतांना शरद पवार म्हणाले की, बीडमध्ये निष्ठेच्या बाबतीत कधीच तडजोड केली जात नाही. त्यामुळे अशा निष्ठावान लोकांच्या मागे बीडची जनता सातत्याने उभी राहाते असे मत व्यक्त केले.

शरद पवार यांच्या सभेच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य चेहरे म्हणून काही नावं समोर येत आहेत. आजच्या सभेत परळीचे जनक्रांती सेनेचे प्रमुख बबनराव गिते हे शक्तीप्रदर्शन करत राष्ट्रवादीत NCP दाखल झाले. केज विधानसभेचे माजी आमदार पृथ्वीराज साठे, बीडचे आमदार व सभेचे संयोजक आमदार संदीप क्षीरसागर, बीडचे माजी खासदार व माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड, माजी आमदार सय्यद सलिम आदी मंचावर उपस्थित होते. शरद पवार यांनी गेवराईचे माजी आमदार बदामराव पंडीत यांच्या निवासस्थानी भेट दिली. स्वाभिमान सभेत पवारांसह आमदार जितेंद्र आव्हाड, आ. संदीप क्षीरसागर, सक्षणा सलगर, महेबुब शेख यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकुन टिका केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!