Road Robbery… गावाकडे जाणाऱ्या दिर भावजाईस लूटलं ; धारुर- पिंपरवाडा घाटातील घटना.

किल्लेधारुर दि.25 अॉगस्ट – Road Robbery… धारुर तालुक्यातील पिंपरवाडा घाटात दुचाकीवरील दिर व भावजईस लुटल्याची घटना समोर आली आहे. याबाबत धारुर Dharur पोलिस ठाण्यात Police गुन्हा नोंद झाला आहे. ( Road Robbery… The husband and wife who were going to the village were robbed; Dharur-Pimparwada ghat incident.)
याबाबत मिळालेली माहिती अशी की, धारुर तालुक्यातील पिंपरवाडा येथील श्रीकिसन कारभारी तिडके हे आपल्या भावजईसह सोनिमोहा या गावी मंगळवार दि.22 रोजी गेले होते. सांयकाळी सोनिमोहा येथून परतत असताना धारुर Dharur शहरात एका हॉटेलमध्ये चहा घेवून पिंपरवाडा गावाकडे आपल्या दुचाकीवरुन निघाले. पिंपरवाडा घाटात Ghat पाठीमागून येणाऱ्या स्कार्पियो गाडीतील अज्ञात चौघांनी दुचाकीस आढवे येवून गाडी आडवली. सदर चौघांनी त्यांच्या भावजईच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व अंगठ्या अशा चार तोळे सोन्याचे दागिने व जवळचे 19 हजार नगदी रोख रुपये मारहाण करत लुटले. यात दिर भावजई किरकोळ जखमी झाले आहेत. सदर घटनेनंतर धारुर पोलिस Police ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून तालुक्यात चोरी व लूटीचे प्रकार वाढत असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.