बीड

Tension in Majalgaon धारुरमध्ये शेकडो तरुण रस्त्यावर ; माजलगावात राडा.

60 / 100

किल्लेधारुर/माजलगाव  दि.2 सप्टेंबर – Tension in Majalgaon जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेचे पडसाद ठिकठिकाणी दिसून येत असून आज धारुर शहर व तालुक्यात शेकडो तरुण रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळून घटनेचा निषेध करण्यात आला. तर माजलगाव शहरात रस्त्यावर उतरलेल्या जमावाने हॉटेलवर दगडफेक करत राडा केल्याची घटना घडली. (Tension in Majalgaon, Hundreds of youths on streets in Dharur. )

काल दि.1 सप्टेंबर शुक्रवार रोजी जालना जिल्ह्यातील अंतरली सराटे येथे मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकावर पोलिसांनी Police अमानुष लाठीचार्च केल्याची घटना घडली. या घटनेचा राज्यात तीव्र पडसाद उमटत असून अनेक वाहनाच्या जाळपोळीच्या घटना घडल्या. आज मराठा क्रांती मोर्चाच्या Maratha reservation वतीने बीड Beed जिल्हा बंदची हाक दिली. या बंदमध्ये धारुर Dharur शहर व तालुक्यात उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेकडो तरुणांनी एकत्र येत घटनेचा शांततेत निषेध नोंदवला. माजलगाव शहरात मात्र बंदला गालबोट लागले. शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या Maratha reservation जमावाने बंदच्या आवाहनाला प्रतिसाद न देणाऱ्या हॉटेलवर दगडफेक करत राडा घातला. यामुळे माजलगाव शहरात काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी Police वेळीच दखल घेत जमाव पांगविला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!