आरोग्य

African swine fever… धारुरमध्ये आढळले आफ्रिकन स्वाईन फिवरचे पॉजिटिव्ह नमुने…

59 / 100 SEO Score

किल्लेधारूर दि.12 अॉक्टोंबर – African swine fever धारूर Dharur शहरात डुकरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने पशू वैद्यकीय विभागाने पाठवलेल्या मृत जनावरांच्या व्हिसेरात Viscera आफ्रीकन स्वाईन फेवरची लागण असल्याचा पॉजिटीव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. यामुळे शहरातील बाराभाई गल्ली ते एक कि.मी. परीसरातील डुकरे नष्ट करण्याची मोहीम गुरूवारी शहरात पाच पथके नेमूण करण्यात येणार आहे. ( African swine fever positive samples found in Dharur…)

जनावरांमध्ये वेगवेगळ्या रोंगाचा फैलाव होत असल्याचे अलिकडच्या काळात आढळून येत आहे. पाळीव प्राण्यांत लंम्पी आजाराने थैमान घातलेले असतानाच धारूर शहरात डुकरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले. याबाबत नगर परीषदेकडे नागरीकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्यानंतर नगरपरीषदेने पशूवैद्यकीय विभागास याबाबत माहिती कळवली. पशु वैद्यकिय विभागाकडून या मृत डुकराचा रक्त व व्हिसेरा पुणे प्रयोगशाळे मार्फत भोपाळ प्रयोगशाळेला पाठवण्यात आला. या व्हिसेरा व रक्तनमूनाचा तपासणी अहवाल आला असून या व्हिसरात Viscera आफ्रीकन स्वाईन फेवर (African swine fever) पॉजिटीव्ह आढळून आला. यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणे मार्फत गुरूवारी Dharur शहरात बाराभाई गल्ली ते एक कि.मी. बाधित क्षेत्रातील डुकरांना नष्ट करण्याची मोहीम पशूसंवर्धन विभाग राबवत आहे. या प्रशासकीय मोहीमेस सहकार्य करावे असे आवाहन पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब गायकवाड यांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!