Indian Army… धारुरमध्ये भारतीय सैन्याच्या ईको बटालियनची दिवाळी.

किल्लेधारुर दि.13 नोव्हेंबर – Indian Army… धारुर शहरात वास्तव्यास असलेल्या भारतीय सैन्याच्या 136 ईको बटालीयन मधील सैनिकांनी दि.12 रविवार रोजी दिपावली Diwali साजरी केली. यावेळी शहरातील नागरीक व पत्रकार सहभागी होते.
मराठवाड्यातील वनक्षेत्र वाढविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विद्यमाने प्रयत्न केले जात आहे. मराठवाड्यात सध्या केवळ 7 टक्के वनक्षेत्र असून याची वाढ करुन 30 टक्क्यापर्यंत नेण्यासाठी भारतीय सैन्याच्या 136 ईको बटालियनकडे धारुर वनपरिक्षेत्रातील 135 हेक्टर वन विभागाची जमीन हस्तांतरण करण्यात आलेली आहे. पुढील पाच वर्ष या क्षेत्रात इको बटालियन वृक्ष लागवड व संवर्धन करणार आहे. यासाठी धारुर Dharur शहरातील वन कार्यालय Forest office व हुतात्मा काशिनाथ चिंचाळकर व्यायामशाळा येथे सध्या सैनिकांची तात्पुरती निवासी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आज दि.12 रविवारी येथील व्यायामशाळेत बटालियनकडून दिवाळी निमित्त कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी या बटालियनचे नायब सुभेदार चंद्रशेखर भांड, हवालदार जलील शेख, शिपाई दयानंद कदम आदी सैनिक उपस्थित होते. यावेळी बटालियनच्या कार्याबद्दल हवलदार जलील शेख यांनी माहीती दिली. यावेळी पञकार अनिल महाजन यांनी बोलताना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन सिमेचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्याचा वेगळा अद्वितीय अनूभव व आनंदी क्षण असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी उत्तललाल तोष्णीवाल, पत्रकार सय्यद शाकेरअली, संतोष सद्दीवाल, वनविभागाचे संभाजी पारवे आदी उपस्थित होते. याप्रसंगी सर्वांना दिवाळीच्या फराळ अल्पोपहार व चहाची व्यवस्था करण्यात आली होती.