घात-अपघात

BSNL Tower accident मुलीचे प्रेत तहसील कार्यालयात ; नातेवाईकांचा आक्रोश.

62 / 100 SEO Score

किल्लेधारुर दि.12 मे – BSNL Tower accident येथील तहसील कार्यालयात कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बीएसएनएल टॉवरच्या अपघातात मृत पावलेल्या मुलीचे प्रेत नेवून नातेवाईकांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. यावेळी शिकलकरी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते. मृत मुलीच्या नातेवाईकांनी यावेळी आक्रोश दिसून आला.

याबाबत अधिक वृत्त असे की, काल दि.11 मे शनिवारी शहरातील संभाजी नगर मधील जुने बीएसएनएल अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे कोसळले. या अपघातात टॉवर परिसरात राहणाऱ्या शिकलकरी समाजातील अनेक घरांची नासधूस झाली तर एका कुटूंबातील तीन मुली, एक महिला व एक पुरुष असे पाच जण जखमी झाले. यातील राधा कौर ही आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. आज दि.12 मे रविवारी सदर मृत मुलीचे प्रेत नातेवाईक व समाजातील नागरीकांनी थेट तहसील कार्यालयात नेले. यावेळी मृत मुलीच्या कुटूंबियांनी संबंधित दुरसंचार कार्यालयातील अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे, नुकसानभरपाई मिळणे, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या अपघातामुळे मृत मुलीच्या कुटूंबीयांना व जखमीना आर्थिक मदत मिळणे आदी मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी तहसीलदार जीवककुमार कांबळे, स. पोलिस निरिक्षक डि.बी. वाघमोडे यांनी मृत व जखमी झालेल्यांच्या कुटूंब व नातलगांशी सहानुभूतीपुर्वक चर्चा करुन मदत मिळवून देण्याचे व कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यानंतर मुलीचे प्रेत अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!