घात-अपघात

Accident टिप्परच्या धडकेत शेतकरी ठार; संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको.

65 / 100 SEO Score

किल्लेधारुर दि.26 अॉगस्ट – Accident खामगाव-पंढरपुर या राष्ट्रीय महामार्गावर धारूर तालुक्यातील गांवदरा येथे भरधाव टिप्परने धडक दिल्याने रामा सिताराम घुले (वय 48) हे जागीच ठार झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. सततच्या अपघातामुळे टिप्पर चालकांच्या बेभान वर्तनामुळे संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या मांडून संताप व्यक्त केला.

धारुर तालुक्यातील गांवदरा ऊसतोड कामगार रामा सिताराम घुले (वय 48) यांना भरधाव टिप्पर (क्र. एमएच 21 बीएच 1600) याने आज दि.26 सोमवार रोजी सकाळी दहाच्या सुमारास जोराची धडक दिली. सदर अपघात खामगाव-पंढरपुर या राष्ट्रीय महामार्गावर घडला. या भीषण अपघातात रामा घुले यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी बस स्थानक परिसरात राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम केला. घटनेची माहिती मिळताच तहसील व पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ग्रामस्थांनी महामार्गावर भरधाव टिप्परमुळे अनेक अपघात होत असुन बिनधास्त वाहन चालवणाऱ्या टिप्पर चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली. प्रशासनाकडून दखल घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको मागे घेतला. यावेळी भाजपाचे युवानेते बाबरी मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!