राजकीय

NCP माजलगाव मतदारसंघासाठी महत्त्वाची अपडेट…. राष्ट्रवादीचा उमेदवार जाहिर.

65 / 100

माजलगाव दि.23 आक्टोंबर – NCP माजलगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी जाहिर केली.

गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवाराकडून माजलगाव मतदारसंघात उमेदवार कोण असणार याची उत्सुकता होती. जयसिंगभैय्या सोळंके व आ. प्रकाशदादा सोळंके यापैकी एक उमेदवार असणार हे निश्चित असताना आ. सोळंके यांनी आपला राजकीय वारस म्हणून जयसिंगभैय्या सोळंके यांना जाहिर केल्यानंतर माजलगावमधून जयसिंगभैय्या सोळंके यांनी चांगलीच कंबर कसली होती. मात्र आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषद घेवून प्रकाशदादा सोळंके यांचे नाव जाहिर केले. यासोबत बारामतीतून अजित पवार, परळीतून धनंजय मुंडे, कागलमधून हसन मुश्रीफ यांच्यासह 38 उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!