prakash_solanke मी अधिकृत काम करते अनाधिकृत नाही, युतीधर्म पाळण्याचे आ. पंकजा मुंडे यांचे आवाहन.

किल्लेधारुर दि.10 नोव्हेंबर – prakash_solanke महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रकाशदादा सोळंके यांना प्रचंड मतांनी निवडून द्या कुठल्याही भुलथापांना बळी पडू नका, मी अधिकृत काम करते अनाधिकृत नाही असे म्हणत भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी धारुरमध्ये जाहिर सभेतून आ. प्रकाशदादा सोळंके यांच्या प्रचाराचा नारळ फोडला.
महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रकाशदादा सोळंके यांच्या प्रचारार्थ भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजा मुंडे यांची जाहिर सभा धारुर शहरात घेण्यात आली. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्राप्रमाणा देश प्रथम आहे. आमच्याकडे सच्चे व प्रामाणिक कार्यकर्ते असल्याचे सांगत युतीधर्म पाळण्यासाठी आणि युतीचे उमेदवार प्रकाशदादा सोळंके यांच्या विजयासाठी मी आल्याचे सांगितले. यावेळी बंडखोरीवर बोलताना आ. मुंडे यांनी मी अधिकृत काम करते अनाधिकृत नाही कोणी गैरवापर करत असेल तर भुलथापांना बळी न पडता महायुतीचे उमेदवार प्रकाशदादा सोळंके यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार आ. प्रकाशदादा सोळंके, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, माजी नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी, माजी जि.प. सभापती जयसिंगभैय्या सोळंके यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सभेला पंचक्रोशीतील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.