माझं गाव

Main Road Dharur धारूर शहरात मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात …

60 / 100

किल्लेधारुर दि.25 – Main Road Dharur छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नागरी रुग्णालय व काशिनाथ चौक ते कसबा हनुमान मंदिर या मुख्य रस्त्याचे नूतनीकरण करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पाहणीत मुख्य रस्त्यावर अतिक्रमण काढण्यासाठी नगरपालिकेकडून आज दि.25 फेब्रुवारी मंगळवारी सुरुवात करण्यात आली आहे.

नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते काशिनाथ चौकापर्यंत रस्त्यालगतच्या व्यवसायिकांना अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना यापुर्वीच केल्या आहेत. नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश गायकवाड यांनी आज दि.25 मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्यासह प्रत्यक्ष अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या जुन्या नाल्यापर्यंतचे सर्व अतिक्रमण जेसीबी मशिनने पाडण्यात येत आहे. या रस्त्याचे काँक्रीट काम व नालीबांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे. तर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नगर परिषद करणार आहे. सदर रस्त्याचे नालीबांधकाम हे भुमिगत होत असून लवकरात लवकर दर्जेदार काम पुर्ण करण्यासाठी नगर परिषद प्रशासन प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया मुख्याधिकारी महेश गायकवाड यांनी दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!