निवृत्त प्रा. प्रल्हादराव शिनगारे यांचे निधन

किल्लेधारूर दि.१२(वार्ताहर) येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक प्रल्हादराव शिनगारे (७५) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज दि.१२ मंगळवार रोजी सकाळी ६.३० वाजता निधन झाले.

नोकरी ही काही तासांपुरती नसती हे दाखवून देऊन आपण जिथे काम करतो, त्या संस्थेविषयी प्रेम, जिव्हाळा व आपुलकी आणि आपण शहराचे काहीतरी देणे लागतो” या भावनेतून कृतज्ञपणे काम करणारे प्राध्यापक म्हणून नावलौकिक असलेले प्रल्हादराव शिनगारे यांचे आज निधन झाले. किल्ले धारूरच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील शांतता, शिस्तप्रिय व विद्यार्थ्यांत भितीयूक्त आदर असणारे प्राध्यापक म्हणून ते ओळखले जात. इतिहासाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी महाविद्यालयात अनेक वर्षे सेवा केली. ॲड. परमेश्वर शिनगारे यांचे ते वडील होत. त्यांच्या पार्थिव देहावर महाविद्यालयासमोर असलेल्या स्मशानभुमीत अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना नातवंड असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!