पोलिसांसाठी अर्सेनिक अल्बम औषधाचे वाटप.

लक्ष्मी क्लिनिकचा उपक्रम

किल्लेधारुर दि.१७(प्रतिनिधी) कोरोना विरुद्धच्या लढ्यात आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणा-या पोलिसांच्या रोग प्रतिकार शक्तीत वाढ व्हावी म्हणून शहरातील लक्ष्मी क्लिनिक चे डॉ.नवनाथ चव्हाण यांनी होमिओपॅथिक औषध अर्सेनिक अल्बम स.पोलिस निरीक्षक सुरेखा धस यांच्या उपस्थितीत पोलिसांना वाटप करण्यात आले.

कोरोना व्हायरसने जगभरासह भारतातही हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी शासन विविध उपाय योजना करीत आहे. या लढ्यात आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणा-या अनेक पोलिसांना या विषाणूची बाधा झाली आहे. पोलिसांची रोग प्रतिकारक शक्ती वाढावी तसेच त्यांचे मनोधैर्य वाढावे म्हणून शहरातील लक्ष्मी क्लिनिकचे बालरोग तज्ञ डॉ.नवनाथ चव्हाण यांनी सामाजिक कर्तव्य म्हणून आयुष मंत्रालय भारत सरकार तर्फे कोरोना प्रतिकार शक्ती वर्धक होमिओपॅथिक औषध अर्सेनिक अल्बम मोफत वाटप करण्यात आले. यावेळी किल्लेधारूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक सुरेखा धस, बालरोग तज्ञ डॉ.नवनाथ चव्हाण, भारत चव्हाण, लक्ष्मण गुरव, आकाश जमाले, निहाल जरगर, गोकुळ रेंगे व सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!