कोव्हीड १९ प्रतिबंधात्मक होमिओपेथिक शिबिराचे आयोजन

किल्लेधारूर दि.२१(वार्ताहर) येथील ग्रामीण रुग्णालय आयुष विभाग व डॉ. सतीश वारे, सुषमा क्लिनिक बीड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२२ शुक्रवार रोजी आरोग्य प्रशासन, पोलिस प्रशासन, नगर परिषद प्रशासन व पत्रकारांसाठी कोविड १९ च्या अनुषंगाने होमिओपॕथी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कोविड १९ प्रतिबंधात्मक होमिओपॕथिक औषधी अर्सेनिक अल्बम हे औषध रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास अत्यंत उपयोगी सिध्द होत आहे. राज्यात सध्या कोविड १९ ने धुमाकुळ घातला आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी, नगर परिषदेचे कर्मचारी, पदाधिकारी व पत्रकार जिवाची पर्वा न करता विशेष परिश्रम घेत आहेत. या सर्वांच्या रोग प्रतिकारशक्ती वृध्दीसाठी ग्रामीण रुग्णालय आयुष विभाग व डॉ. सतीश वारे, सुषमा क्लिनिक बीड यांच्या वतीने होमिओपॕथिक शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात सोशल डिस्टंटींगचा नियम पाळण्यासाठी तपसणीची सर्वांना वेगवेगळ्या वेळा देण्यात आल्या आहेत. यात सर्वप्रथम १२.३० वाजता ग्रामीण रुग्णालय अधिकारी व कर्मचारी, दुपारी १ वाजता पोलिस अधिकारी व कर्मचारी, दुपारी १.३० वाजता पत्रकार, दुपारी २ वाजता नगर परिषद कर्मचारी व पदाधिकारी अशा तपासणी करुन शिबिर घेण्यात येत आहे. या शिबिरात सर्व संबंधितांनी ठराविक वेळी सहभागी होवून सहकार्य करण्याचे आवाहन वैद्यकिय अधिक्षक डॉ. चेतन अदमाने, आयुष विभाग प्रमुख डॉ. शेख परवेज, डॉ. सतीश वारे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!