माजलगाव, धारूर, परळी तालुक्यातील २० गावे सील
संपर्कातील चार जनांचे स्वॕब पाठवले

किल्लेधारूर :दि. २१(प्रतिनिधी) माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथे ११, सुर्डी येथे ०१ आणि धारूर तालुक्यातील कुंडी येथे ०१ कोरोनाग्रस्त आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने या गावांच्या तीन किलोमीटरच्या परिसरात येणारी माजलगाव, धारूर आणि परळी तालुक्यातील एकूण २० गावे कंटेनमेंट झोन घोषित करून सील केली आहेत. दरम्यान धारुर तालुक्यातील कुंडी येथील रुग्णाच्या संपर्कातील चौघांचे स्वॕब पाठवल्याची माहिती तिलुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी दिली.
माजलगाव तालुक्यातील नित्रुड, रेखानाईक तांडा, मोहकुळ तांडा, चंद्रभान तांडा, हरजळा तांडा, शेरी तांडा, बडेवाडी (आनंदवाडी), साळवण तांडा, सुर्डीनजीक, राजेगाव, फुलसिंगनगर आणि वांगी या गावांचा परिसर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला. तर, धारूर तालुक्यातील कुंडी, जैतापूर, सुकळी, मुंगी, शेरीतांडा तहत (देवठाना), फकीर जवळा आणि परळी तालुक्यातील तपोवन,, खामगाव या गावांचाही परिसर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. ही सर्व गावे अनिश्चित कालावधीसाठी बंद करून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. धारुर तालुक्यातील कुंडी येथील रुग्णाच्या संपर्कातील चौघांचे स्वॕब तपासणी साठी पाठवण्यात आले असुन सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे.