धारुर तालुक्यातील कुंडीचा एक पॉझिटीव्ह

उर्वरित अहवाल निगेटिव्ह

किल्लेधारूर दि.२२(प्रतिनिधी) तालुक्यातील कुंडी येथील पॉझिटीव्ह  रुग्णांच्या संपर्कातील व इतर असे २० स्वॕब नमुने तपासणीसाठी लातूर येथील स्व. विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आली होती. यापैकी कुंडी येथील रुग्णाच्या संपर्कातील एक महिला पॉझिटीव्ह आली असून उर्वरित सर्व निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी दिली. बीड जिल्ह्यातील आज पाठवलेल्या ४२ स्वॕब पैकी ३ पॉझिटीव्ह अहवाल आली आहेत. यात बीड, वडवणी व धारुरचा प्रत्येकी एक रुग्ण आहे.

दोन दिवसांपुर्वी आलेल्या अहवालात किल्लेधारुर तालुक्यातील कुंडी येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह होता. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुटूंबियातील सहा सदस्य तसेच दि.२१ गुरुवारी याच कुटुंबातील स्वॕब घेतलेले आठ सदस्य व तेलगाव येथील दोघांचे व बोडखा येथील एक असे एकुण १७ व एका गुन्ह्यातील तीन आरोपीचे मिळून २० स्वॕब स्व. विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आली होती. यापैकी केवळ पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील एका नातेवाईकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सदरील पॉझिटीव्ह आलेली रुग्ण देखील पुर्वीच्या रुग्णा सोबत मुंबईहून आलेली आहे. इतर सर्व अहवाल निगेटिव्ह आली आहेत अशी माहिती डॉ. शेकडे यांनी दिली. यामुळे इतरांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!