कोरोंटाईन लोकांना स्वखर्चातून मदत पुरवणारी सुरक्षा समिती

किल्लेधारूर दि.२४(वार्ताहर) आज प्रभाग क्रमांक दोन मध्ये सुरक्षा समिती मार्फत बाहेरगावाहून आलेल्या होम कोरोंटाईन असलेल्या लोकांना स्वखर्चातून आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले असून अशा स्वरुपाची मदत करणारी बहुधा जिल्ह्यातील ही पहिलीच सुरक्षा समिती असेल.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानूसार शहरी भागात प्रभाग सुरक्षा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. शहरातील काही सुरक्षा समित्यांनी होम कोरोंटाईन केलेल्या लोकांच्या भेटी घेत विविध सुचना केल्या. शहरातील प्रभाग दोन मधील सुरक्षा समितीनेही अशा भेटी दिल्या. यावेळी समितीसमोर लोकांनी आपले प्रश्न मांडत काही आवश्यक वस्तू पुरवण्याची मागणी केली. प्रभागातील नगरसेवक पती संतोष बप्पा शिरसाट, राम शेळके यांनी लगेच किराणा किट स्वखर्चाने उपलब्ध करून दिल्या. यावेळी संतोष बाप्पा सिरसट, राम शेळके, न. प. कर्मचारी किरण नेहरकर, पत्रकार प्रकाश काळे, संदिपान तोंडे, अतुल शिनगारे, परमेश्‍वर राऊत उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!