शर्वरी काकडे चे अक्षरगंगा स्पर्धा परीक्षेत यश

केज दि.२ (प्रतिनिधी) तालुक्यातील बनसारोळा येथील केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वर्ग तिसरीची विद्यार्थ्यीनी कु. शर्वरी केशवराव काकडे अक्षरगंगा स्पर्धा परिक्षेत बीड जिल्ह्यात तृतीय आली आहे.
राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर अक्षरगंगा मार्फत स्पर्धा परिक्षा घेण्यात येतात. नुकताच अक्षरगंगा स्पर्धा परिक्षेचा निकाल घोषित करण्यात आला आहे. या राज्यस्तरीय परिक्षेत केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनसारोळा येथील वर्ग तिसरीची विद्यार्थीनी कु.शर्वरी केशवराव काकडे बीड जिल्ह्यातून तृतीय आली आहे.शर्वरी काकडे हिने 300 पैकी 242 गुण प्राप्त केले. शिक्षिका श्रीमती शितल कदम मॅडम यांचे तिला मार्गदर्शन लाभले. कु. शर्वरी काकडे हि विद्यार्थीनी महाराष्ट्र विद्यालय बनसारोळा येथील सहशिक्षक केशवराव काकडे आणि केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनसारोळा येथील सहशिक्षिका श्रीमती शितल कदम यांची मुलगी आहे. कु.शर्वरी काकडेच्या यशाचे केंद्र प्रमुख तुकाराम देशमुख, मुख्याध्यापक डी.एस.करपे , बालासाहेब गोरे,चंद्रकांत मोरे, सोनवणे सर , श्रीमती गोरे मॅडम, श्रीमती मीना जाधव मॅडम, श्रीमती समुद्रे मॅडम, श्रीमती चव्हाण मॅडम , श्रीमती धेंडे मॅडम, श्रीमती कुलकर्णी मॅडम यांनी कौतुक केले.