आता शासनाचे “टास्क फोर्स अॉन आयुष फॉर कोविड-१९”

मुंबई दि.८(प्रतिनिधी) कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनास तसेच राज्यातील आरोग्य यंत्रणेतील जबाबदार अधिकाऱ्याना आयुर्वेदीक, युनानी, होमिओपॕथिक, योग चिकित्सा पध्दतीच्या अमंलाबाबत सुचना व सल्ला देण्यासाठी शासन निर्णयाद्वारे “टास्क फोर्स अॉन आयुष फॉर कोविड-१९” गठित करण्यात आला आहे.

आयुष मंत्रालय, नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या बैठकीत कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर निर्गमित केलेल्या आयुष विषयक मार्गदर्शक सुचनांच्या आधारावर सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात आला. यात कोविड-१९ या साथ रोगाकरीता आयुर्वेद, युनानी व होमिओपॕथी विषयक मार्गदर्शक सुचना तयार करण्यात आल्या आहेत. या सुचनांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने “टास्क फोर्स अॉन आयुष फॉर कोविड-१९” चा निर्णय घेतला आहे. यात अनेक प्रतिबंधात्मक उपाय सुचवण्यात आली आहेत. शिवाय आयुष उपचार व रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदीक, युनानी व होमिओपॕथिक औषधांचा समावेश करण्यात आला आहे. आयुर्वेदातील संशमनी वटी, आयुष क्वाथ, च्यवनप्राशासह काही उपचार तर युनानीच्या काढा/जोशंदा, खमिरा मरवारीद यासह होमिओपॕथिक औषध अर्सेनिक अल्बम ३० याचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!