माजलगाव, धारुर, वडवणीत रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

किल्लेधारूर दि.१०(वार्ताहर) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २१ व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबिरास माजलगाव मतदारसंघातील माजलगाव, धारुर व वडवणी तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसुन आले.

माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आ. प्रकाशदादा सोळंके यांच्या हस्ते फित कापुन रक्तदान शिबिराचे उदघाटन झाले. तर धारुर येथील ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रवादीचे जिल्हा कोषाध्यक्ष माधवराव निर्मळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन रक्तदान शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी स्वा.रा.ति. अंबाजोगाई येथील रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टंटींगचे पालन करत रक्तदात्यांच्या नोंदी घेत प्रत्यक्ष रक्तदानाला सुरुवात केली. माजलगाव येथे रक्तदान शिबिरास आ. प्रकाशदादा सोळंके यांच्यासह अशोक डक, डॉ. साबळे, रमेश सोळंके, जयसिंह सोळंके, चंद्रकांत शेजुळ, कल्याण आबुज, नासेरखान पठाण, जयदत्त नरवडे, राहुल लंगडे, खलील पटेल, विजय शिंदे, चांद्रमनी डोंगरे, नाना नाटकर, चंद्रकांत पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तर धारुर येथील रक्तदान शिबिरात माधवराव निर्मळ यांच्यासह सय्यद शाकेर, प्रा. इश्वर मुंडे, नितिन शिनगारे, हनुमंत नागरगोजे, सुधीर शिनगारे, संजित कोमटवार, मुजाहेद मोमीन, परमेश्वर तिडके, सटवा अंडिल, डॉ. चेतन आदमाने, डॉ. परवेज शेख आदींची उपस्थिती होती. मतदारसंघात वडवणी व तेलगाव येथेही शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!