बीडचे तीन जन पॉझिटीव्ह; २७ प्रलंबित


बीड दि.१०(प्रतिनिधी)  बीड जिल्हयातील आज एकूण १३० व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यात धारुर तालुक्यातील आंबेवडगाव येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या माजलगाव येथील रुग्णालयातील स्टाफसह ५८ जनांचा समावेश होता. या १३० पैकी बीडचे ३ जन पॉझिटीव्ह आले आहेत तर २७ अनिर्णित आहेत. १०० अहवाल निगेटिव्ह आली आहेत. अहवालासाठी मात्र रात्री उशिरापर्यंत प्रतिक्षा करावी लागली.

कोविड-१९ च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील १३० थ्रोट स्वॅब आज स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते. माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिलेल्या  माहिती प्रमाणे आजच्या थ्रोट स्वॅब पैकी बीड येथील बाधितांच्या संपर्कातील  ३ पॉझिटीव्ह तर १०० निगेटिव्ह  आली आहेत. तर २७ अहवाल अनिर्णित राहिली आहेत. आज जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची संख्या जास्त असल्यामुळे अहवालाची  माहिती उपलब्ध होण्यास रात्री उशिर झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!