वीज पडून अठरा वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

केज दि.२९(प्रतिनिधी) तालुक्यातील कुंबेफळ येथे एका अठरा वर्ष वयाच्या तरुणाचा वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि.२९ जून सोमवार रोजी सायं ५:०० च्या सुमारास घडली असून याबाबत युसूफ वडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

श्रीनिवास सुरेश तपसे व त्यांची आई हे कुंबेफळ येथे त्यांच्या पाहुण्याला भेटून मोटार सायकलवरून चंदनसावरगाव येथे गावाकडे जात होते. त्यावेळी कुंबेफळ पासून एक कि.मी. अंतरावर सगजनी नावाने ओळखल्या जात असलेल्या शेताजवळ आले असता अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे ते मोटार सायकल बाजूला थांबवून निवाऱ्यासाठी तेथे  जवळच असलेल्या एका पत्र्याच्या शेडकडे जात असताना श्रीनिवास सुरेश तपसे वय (१८) वर्ष यांच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी युसूफ वडगाव पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात येत असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे आणला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!