जाणून घ्या अचानक का वाढली “स्वॅब” ची संख्या

बीड दि.१(वार्ताहर)  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला असुन तालुका पातळीवर अधिकृत अंतर्रुग्णसेवा देणाऱ्या शासकीय व खाजगी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व राज्यातील हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणाहून येणाऱ्या लोकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला असून याची अंमलबजावणी सुरु झाल्याने अचानक स्वॅबची संख्या वाढली आहे.

राज्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा वरच्या वर फुगत असल्याचे दिसत आहे. बीड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात नवीन रुग्णांची भर दिवसेंदिवस पडत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात कोविड १९ टेस्ट प्रयोगशाळेत तालुकानिहाय तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात तीन स्वॅब कलेक्शन सेंटर करुन दैनंदिन तपासणीची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. यात खाजगी दवाखाने, शासकीय रुग्णालय यातील संशयित रुग्णांसह सर्व डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांचे स्वॅब तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपुर, सोलापुर, नाशिक अशा हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणावरुन प्रवास करुन आलेल्या ५ ते १४ दिवस झालेल्या लोकांचे स्वॅब नमुने तपासणी साठी पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहे. याचे नियोजन तालुका व गावपातळीवर करण्यात येत असून कर्मचाऱ्यांची स्वॅब पाठवण्यास सुरुवात झाली आहे. पुर्वी आरोग्य प्रशासन पॉझिटीव्ह रुग्णाच्या अत्यंत जवळचा संपर्क आलेल्या व्यक्तींचेच स्वॅब नमुने तपासणीसाठी घेत असत. यामुळे गेल्या दोन दिवसात अचानक पाठवण्यात येणाऱ्या स्वॅबची संख्या वाढल्याचे दिसुन येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!