अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस पाच दिवसांची पोलिस कोठडी

किल्लेधारूर दि.६(वार्ताहर) धारूर तालूक्यातील चोंराबा येथे सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार करणाऱ्या आरोपीस आज न्यायालया समोर हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरेखा धस या करत आहेत.
तालूक्यातील चोरांबा येथील सोळा वर्षीय मुलीचे आई वडील ऊस तोडणीसाठी गेलेले असताना ती आजी कडे राहत होती. डिंसेबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत गावातील एका मुलाने जबरदस्ती करून तिच्या वर लैंगिक अत्याचार केला. तिचे पोट वर आल्याने तिला अंबाजोगाई येथील स्वा.रा.ति. रुग्नालयात दाखवले असता ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी संबंधीत अत्याचारीत मुलीच्या तक्रारी वरून आरोपी उमेश रामप्रभू इरमले यांच्यावर लैंगिक अत्याचार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीस रविवारी अटक करत आज न्यायालया समोर हजर केले. न्यायालयाने आरोपीस दि.१० जुलै पर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सदरील प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरेखा धस या करत आहेत.