
बीडः रात्री दिड वाजता आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा आज ३७ ने वाढला आहे. यात बीड शहर व परळी तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळली आहेत. धारुर तालुक्यातून पाठवण्यात आलेली सर्व २१ अहवाल निगेटिव्ह आली आहेत.
रात्री दिड वाजता आलेल्या अहवालानुसार बीड शहरात १५ तर परळी तालुक्यात एकुण ११ अशी सर्वाधिक रुग्णाचा समावेश आहे. याखालोखाल अंबाजोगाई शहरात हाऊसिंग सोसायटी भागात ६ पॉझिटीव्ह आढळली आहेत. याशिवाय गेवराई शहरात ४ व केज तालुक्यातील बन्सारोळा येथे १ असे जिल्ह्यात एकुण ३७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. यात १७ जन पॉझिटीव्ह रुग्णाच्या सहवासित किंवा संपर्कातील तर २० रुग्ण नवीन आहेत. आजच्या अहवालात २४ पुरुष तर १३ महिला संक्रमित आहेत. धारुर तालुक्यातील चोंडीच्या संपर्कातील ६ व इतर अशी २१ अहवाल निगेटिव्ह आली आहेत.
कृपया बातम्या जास्तीत जास्त शेअर करा….



