अभिषेकच्या अकाली निधनाने हळहळ

किल्लेधारूर दि.२५(वार्ताहर) येथील सतत हसतमुख असणाऱ्या जानवी मोबाईलचे चालक मालक अभिषेक प्रदिप शिनगारे (२२) या तरुणाच्या आत्महत्येमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अभिषेक याने दि.२४ शुक्रवार रोजी रात्री ११ च्या सुमारास दुकानात गळफास घेतला. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुण मित्र गमावल्याने मित्र मंडळीत सोशल मेडियातून मोठ्या प्रमाणात संवेदना व्यक्त होत आहेत. अभिषेक हे येथील कसबा विभागातील सामाजिक कार्यकर्ते प्रदिप नाना शिनगारे यांचे एकुलता एक मुलगा तर राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्ते गणेश सावंत यांचे मेहुणे होत. त्यांच्यावर कसबा विभागातील वैकूंठभुमीत दुपारपर्यंत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिनगारे यांच्या दुखात बीडन्यूज२४ सहभागी आहे.

आई बाबांचा होता तू लाडका,
नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,
माघारी परतून येरे माझ्या पाखरा,
एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा.
Miss you Abhi…????
???? भावपूर्ण श्रद्धांजली ????

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!