जिल्ह्यात ३७ पॉझिटीव्ह; केज शहरात एक

बीडः रात्री आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा भडका सुरुच असून आज ३७ पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली आहे. आजच्या अहवालात धारुर तालुक्यातील सर्व अहवाल निगेटिव्ह आली आहेत. तर केज शहरात धारुर रोड वरील भवानी चौकात एक रुग्ण आढळून आला आहे.
आज आलेल्या अहवालानुसार बीड शहरात १०, परळीत सर्वाधिक १७, अंबाजोगाई शहरात ४ तर गेवराई व माजलगाव मध्ये प्रत्येकी २ पॉझिटीव्ह आढळली आहेत. याशिवाय आष्टी व केज मध्येही प्रत्येकी १ नवीन रुग्ण आढळून आली आहेत. यात १५ जन पॉझिटीव्ह रुग्णाच्या सहवासित किंवा संपर्कातील तर २२ रुग्ण नवीन आहेत. आजच्या अहवालात २४ पुरुष तर १३ महिला संक्रमित आहेत. जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. आजच्या आकडेवारीत परळीत मोठी संख्या आढळून आली. तर धारुरच्या निकट केज येथे धारुर रोडवर एक महिला पॉझिटीव्ह आढळून आली आहे.