लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल; शहरातील सहा भाग अनिश्चित काळासाठी बंद;

किल्लेधारूर दि.३- शहरात आढळून आलेल्या ७ पॉझिटीव्ह रुग्णांमुळे सहा भाग सध्या अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेली असून हिच परिस्थिती राहिल्यास संपूर्ण शहराचि वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने होत असल्याचे दिसत आहे.

दि.२३ जुलै रोजी शहरात एक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने वडगावकर गल्ली, आयोध्या नगर व मेन रोडचा भाग अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला. याच कंटेनमेंट झोनमध्ये काल एक पॉझिटीव्ह आढळला. यानंतर दि.३१ जूलै रोजी आढळलेल्या दोन पॉझिटीव्ह रुग्णामुळे कसबा विभागात स्वराज नगर व पेठेतील कुरेशी गल्ली बंद करण्यात आली. दि.१ आगस्ट रोजी आढळलेल्या रुग्णांमुळे पोस्ट अॉफीस परिसर व उदयनगर भाग बंद करण्यात आला तर काल दि.२ रोजी आढळलेल्या रुग्णापैकी एकाच्या निवास असलेल्या लक्ष्मी नगर मधील भाग अनिश्चित काळासाठी आज बंद करण्यात येणार आहे. या सर्व बाधितांच्या संपर्कातील १८८ लोकांना आजवर घरात अलगीकरण म्हणजेच होम कोरोंटाईन करण्यात आले असुन ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. यासर्व संपर्कातील लोकांचे स्वॅब नमुने तपासण्याची प्रक्रिया आरोग्य विभागाकडून सुरु आहे. बाधितांचा सोर्स शोधण्यात अडचणी येत असल्याने आरोग्य विभाग अँटिजन रॕपिड टेस्ट वाढवण्याची शक्यता आहे. सध्या शहरात टायफाईड सारख्या रोगाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्याही दिसुन येत आहे. या परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. सध्या शहरात सहा भाग अनिश्चित काळासाठी बंद आहेत. या बंद असलेल्या कंटेनमेंट झोनमध्ये लोकांचा मुक्त वावर दिसत आहे. लोक नियमांचे पालन करत नसल्याने धोका वाढण्याची शक्यता आहे. शहराची व्याप्ती पाहता कंटेनमेंट झोनची आजची संख्या मोठी आहे. शासनाची लॉकडाऊनची भुमिका नसली तरी नाविलाजाने स्वंयस्फुर्तिने लॉकडाऊनचा सामना करण्याची वेळ शहरावर येण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!