जिल्हा पुन्हा लॉकडाऊन…..

बीडः दि.६(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात सध्या कोरोनाचा उद्रेक झालेला असून कोरोना रुग्णांची संख्या अकराशे पेक्षा जास्त झाली आहे. सध्या जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मोठ्या प्रमाणात कंटेनमेंट झोन आहेत. तर काही शहरे स्वंयस्फुर्तिने बंद पाळत आहेत. जिल्ह्यात आज तीनशे पेक्षा जास्त कंटेनमेंट झोन होत आहेत. २२ मार्चच्या जनता कर्फ्यू नंतर सुरु झालेल्या तीन महिन्याच्या लॉकडाऊन नंतर खऱ्या अर्थाने जिल्ह्यात सध्या लॉकडाऊनची परिस्थिती आहे.
जूलै महिन्याच्या मध्यापासुन बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली. बीड शहर व परळी शहरात झपाट्याने संख्या वाढत असताना अंबाजोगाई व गेवराईतही उद्रेकास सुरुवात झाली. या पाठोपाठ केज, माजलगाव व धारुर शहरातही मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. जिल्ह्यात सध्या ११४४ ॲक्टीव रुग्ण संख्या असून आजवर ३९ रुग्ण दगावली आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कंटेनमेंट झोन आहेत. जिल्ह्यात कालपर्यंत २६६ ठिकाणी कंटेनमेंट झोन होती. रात्री आलेल्या अहवालात १०८ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली आहेत. यापैकी तब्बल ६८ रुग्ण नवीन आहेत. म्हणजेच या रुग्णांच्या निवासी भागातही आज कंटेनमेंट झोन होणार आहेत. या बरोबर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नवीन आदेश काढून जिल्ह्यात येण्यासाठी जाण्यासाठी प्रतिबंध घातला आहे. तर जिल्ह्यातील काही शहरात स्वंयस्फुर्तिने बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्या आहेत. तालुकावार कंटेनमेंट झोन पाहता जिल्हा खऱ्या अर्थाने लॉकडाऊन झाला आहे.