धारुरच्या ७ रुग्णांची आज होणार सुट्टी;

किल्लेधारूर दि.१९(वार्ताहर) शहरातील विलगीकरण कक्षात उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ७ बरे झालेल्या रुग्णांची सुट्टी आज सांयकाळी होत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे व कोविड केअर सेंटरचे डॉ. तफिल तांबोळी यांनी दिली.
रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने बीड, अंबाजोगाई येथील विलगीकरण कक्ष हाऊसफूल झाली. यामुळे दि.०९ अॉगस्ट पासुन किल्लेधारूर येथील विलगीकरण कक्षात तालुक्यात आढळून येणाऱ्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना उपचारासाठी दाखल करणे सुरु झाले. आज या विलगीकरण कक्षात ४४ रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी ज्यांनी आठ दिवस पुर्ण केली व त्यांना कसल्याही स्वरुपाचे लक्षणं नाहीत अशांची सुट्टी होणार आहे. आज या विलगीकरण कक्षातून एका पाच वर्षाच्या बालकासह ३ पोलिस कर्मचारी व इतर तीघांची सुट्टि होत आहे. रुग्णांची सोडण्यापुर्वी तपासणी होईल तर पोलिस कर्मचाऱ्यांची ॲन्टीजन टेस्ट करुन निगेटिव्ह असल्यास सुट्टी देण्यात येणार आहे. आज प्रथमच येथील विलगीकरण कक्षात उपचार घेत असलेल्या ७ रुग्णांची सुट्टी होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी दिली.