कोरोंना विशेष
आज ५५ स्वॅब अहवालाची प्रतिक्षा;

किल्लेधारूर दि.२४(वार्ताहर) काल धारुरचे ५५ लोकांचे थ्रोट स्वॅब अंबाजोगाई प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत. या स्वॅबचा चा अहवाल रात्री प्राप्त होणार आहे. दरम्यान धारुर तालुक्याची कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढून ११५ झाला आहे.
गेली २५ दिवस दररोज शहर व तालुक्यात रुग्ण आढळून येण्याची शृंखला सुरु आहे. काल येथील कोविड केअर सेंटरमधून अंबाजोगाई प्रयोगशाळेत ५५ लोकांचे स्वॅब पाठवण्यात आले आहेत. या स्वॅबचे अहवाल रात्री प्राप्त होणार आहेत. तालुक्याची कोरोना रुग्ण संख्या ११५ झाली आहे. आत्तापर्यंत तालुक्यातील ५ जन कोरोनामुळे दगावली आहेत.