मुस्लिम आरक्षणासाठी आ.प्रकाशदादा सोळंके यांना घेराव

माजलगाव दि.२६(वार्ताहर) येथील मुस्लिम संघर्ष समितीच्या वतीने मुस्लिम आरक्षणासाठी माजलगाव मतदारसंघाचे आ. प्रकाशदादा सोळंके यांना आज दि.२६ शनिवार रोजी घेराव घालत निवेदन देण्यात आले.

माजलगाव पाठोपाठ धारुरच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी आज दि.२६ शनिवार रोजी निर्णायक मुस्लिम आरक्षण आंदोलन अंतर्गत लोकप्रतिनिधीना घेराव घालून निवेदन दिले. यावेळी आ. सोळंके यांनी आघाडी शासन मुस्लिम आरक्षणासाठी आग्रही असुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे याबाबत भुमिका मांडली असल्याचे सांगितले. निवेदनात मुस्लिम समाजाची आजची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थिती पाहुन संवेधानिक कायदा करुन १० टक्के आरक्षण द्यावे, मराठा समाजाबरोबर मुस्लिम आरक्षणाचा अध्यादेश काढावा, आगामी शैक्षणिक वर्षांपासुन मुस्लिम विद्यार्थ्यांना खाजगी संस्थेत प्रवेशात १० टक्के आरक्षण द्यावे, शासकीय सेवेत नोकरीत १० टक्के आरक्षण द्या, वाढते हल्ले व मॉबलिंचिंग सारख्या प्रकाराला आळा घालण्यासाठी मुस्लिमांसाठी अॕट्रासिटी सारखा कायदा करावा अशा मागण्या मांडण्यात आल्या आहेत. यावेळी मुस्लिम संघर्ष समितिचे सादेक ईनामदार, अँड. सय्यद साजेद, मुस्लिम संघर्ष समन्वय समिति बीड जिल्हा सरचिटणीस सय्यद रज्जाक, धारूर तालुका समन्वयक शेख अकरम भाऊ, अरशद पठाण, समीर पठाण व इतर मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!