कोरोना रुग्ण आढळून आल्याने भिक मांगो आंदोलन करुन गावात फवारणी

किल्लेधारूर दि.२८ (वार्ताहर)तालुक्यातील पहाडी पारगाव, थेटेगव्हण, ढगेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामपंचायतीच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी व ग्रामस्थांनी कोरोना (corona) रुग्ण  आढळून आल्याने व गावातील स्वच्छतेसाठी भिक मांगो आंदोलन करुन निधी जमा करत त्या निधीतून गावात औषध फवारणी केली.

सध्या सर्वत्र कोरोनाचा (corona) प्रादुर्भाव असुन आता शहारातुन ग्रामीण भागात शिरकाव केला आहे. पहाडी पारगाव येथेही कोरोना बाधित रुग्ण आढळून  आली आहेत. गावात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलेली आहे. यामुळे विरोधी सदस्यांनी भिक मांगो आंदोलन करून ७ हजार ९०० रुपये गोळा करत गावात फवारणी केली.  ग्रामसेवक गावकऱ्यांना व ग्रामपंचायत सदस्यांना निधी उपलब्ध  नाही म्हणून सांगतात त्यामुळे गावातील गोरगरीब जनता ग्रामपंचायतला भीक म्हणून निधी जमा करून देत आहे. भीक मागून गावाचा विकास व गावात स्वच्छता राबविणारी ही एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे. यावेळी विलास मुंडे, गोरख पुर्णे, राजेभाऊ अंडील, सुग्रीव वरकले, नवनाथ इरमले, आसाराम मुंडे, मच्छींद्र पुर्णे, परमेश्वर पाटोळे, बाळराजे अंडील, बंडु मुंडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!